कोणी घर देते का ? या नटसम्राट चित्रपटातील संवादाची प्रचिती आज सर्वत्र येते .
भारतात राहणाऱ्या लोकांची संख्या दीडशे कोरोड च्यावर आहे. त्यात काही जणाकडे स्वतःचे घर आहे, तर काही लोकांन कडे घर नाही ते भाड्याचा घरात राहतात. जी लोक भाडे देऊन राहतात त्या व्यक्ति घराचे भाडे देऊन घरातील व्यक्तींच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मर मर करतो.आशातच जेव्हा करोना वाढला तेव्हा कमविण्याचे सर्व मार्ग बंद झाले. आशा परिस्थितित काही राज्यानी मोठा निर्णय घेतला, कर्मचाऱ्याकडून,मजुरांकडून भाडे मागू नये असे आदेश दिले होते. पण हा आदेश सर्व घर मालक प्रतिकूल परिस्थितीतही पाळतील का ? असे बरीच प्रश्न कर्मचाऱ्याना आणि मजुरांना पडला होता .
"आदेशाचे पालन न केल्यास राष्ट्रीय आपती प्रतिबंध कायदा २००५ च्या कलम ५१ अंतर्गत कारवाई करण्यात येईल ". असे जाहीरपणे सांगितले गेले पण सर्वेघरमालक हा आदेश पाळतील का ? नाही ?
मी एक बातमी वाचली त्या बातमी मध्ये असे लिहिले होते की "आमच्या खोल्या भाड्याने दिल्या आहेत त्यामुळे १ -२ महीने भाडे दिले नाही तरी आमचे काही नुकसान होणार नाही " हे वाचून मनाला शांती मिळाली आता सुद्धा या जगात माणुसकी आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडॉऊन ची घोषणा केली त्यानंतर जे कर्मचारी वर्ग , मंजुरवर्ग यांना घराचे भाडे देणे शक्य नव्हते . आसे काही कर्मचारी ,मंजूर वर्ग यांना आपल्या गावी परत जाण्यास भाग पडले पण आता कोरोना बऱ्यापेकी थांबला आहे पण घराचे भाडे कमी झाले नाही, ही चिंतेची बाब आहे. भाडे करुणे कोणाकडे आपली तक्रार मांडायची
कोरोंना प्रभावित बेघर लोक
सध्या जे लोक भाडयानी राहत आहे . आशाना आज घरं साठी वणवण फिरावे लागत आहे. कारण ; कोरोंना आणि भाडे वाढ!
आज कोरोंना या महामारी मुळे कित्येकाची नोकरी गेली ,कोणाला काम आहे पण पगार टाईमावर मिळत नाही. काम धंदे बंद पडले या कोरोनामुळे कितेक असे भाडेकरू आहेत जे आपले घर चालवण्यासाठी प्रयत्न करत आहे. कमी भाड्याचा घर मिळवण्यासाठी मर-मर करवी लागत आहे. आज तुम्ही जिथे जाल तेथे तुम्हाला दलाल मिळणार ,नको तेवढे घराचे भाव गगनाला पोहचविणेचे काम हे दलाल करत आहे . आज जे कोणी व्यक्ति भेटते ती स्वतःला दलाल सागते. आज लोकांचा पगार वर्षाला वाढत नाही तिथे घराचे भाडे वर्षानु वर्ष वाढत आहे . याला जवाबदार कोण आहे समाजातील अशिक्षित लोक ज्या मुळे घराचे भाडे नको तेवढे वाढवत आहे. आज परिस्थिति बदली आहे पण घरींचे भाडे मात्र कमी झाले नाही . या सर्व समस्येवर काही उपाय महाराष्ट्रा सरकारने करणे गरजेचे आहे. वाढणारे घराचे भाडे ही आजच्या काळाची खूप मोठी समस्या आहे .या काडे सरकारने लक्ष दिले पाहिजे. ही विनंती आहे.


0 Comments