![]() |
| मधुमेह तपासणी यंत्रद्वारे आपण घरी बसल्या तपासू शकतात |
"रक्तातील साखरेचे प्रमाण असंतुलित होणे किंवा वाढणे म्हणजे मधुमेह होय." आपण जे अन्न खातो त्याचे शरीरास आवश्यक ते पोषण मिळणे गरजेचे आहे. आपल्या शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी साखरेत ग्लुकोज निर्माण होणे खूप गरजेचे आहे. जठराजवळील ग्रंथीतून पाझरणाऱ्या इन्सुलिन यामुळे हार्मोन ही साखर शरीरातील पेंशीत शोषून घेण्याची प्रक्रिया घडत असते. आवश्यक त्याप्रमाणात इन्सुलिन तयार न झाल्यास शरीरातील साखरेचे प्रमाण वाढू लागेल .
![]() |
| रक्तातील साखरेचे प्रमाण तपासणे |
कोरोनामुळे देशात लोकडाऊन झाले त्यामुळे व्यक्तीचे जीवनशैली बदली आहे. काही व्यक्तीचे कामे ही घरातूनच करत असल्यामुळे व्यायम कमी झाला, चालणे कमी झाले आहे घरात बसून काम करावे लागत आहे. जास्त अन्न खाल्ले जाते त्यामुळे पुरेसा व्यायाम शरीराला मिळत नाही. वजन वाढणे असे लक्षण दिसायला लागतात. कोरोनाला एक चांगली जागा आपल्या शरीरात करून देण्याचे काम आपण करत आहोत. डॉक्टर कडे जाणे टाळतो.त्यामुळे मधुमेही व्यक्तींच्या आरोग्यावर दुष्परिणाम दिसून येतात. कोरोंना विषाणू हिमोग्लोबीनवर आक्रमण करतात त्यामुळे ऑक्सीजनची क्षमता कमी करतात, शरीराला हवा तेवठा रक्त पुरवठा मिळत नाही. यामुळे साखरेचे प्रमाण जास्त असण्याऱ्या व्यक्तिमध्ये कोरोना होण्याचा जास्त धोका आहे. वेळीच मधुमेहची करणे आणि लक्षणे आढळल्यास डॉक्टरचा सल्ला घेऊन वेळीच उपचार करणे गरजेचे आहे योग्यवेळी उपचार केल्यास कोरोना मात करता येईल आणि मधुमेहावरही मात करता येईल.
![]() |
| रक्तातील साखरेचे प्रमाण |



0 Comments