सध्या भारतात कोरोंना संक्रमण होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. ताज्या आकडेवारीनुसार आज बंधितांची संख्या २७, १७६ आहे . गेल्या काही दिवसापासून हा आलेख सतत चढ उतार दाखवत होता. कोरोंना मुक्त होणाऱ्यांची संख्या ३८,००२. बंधितांची संख्या कमी झाली आणि मुक्त होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे थोडा दिलासा मिळाला. असे असले तरीही लोकानी बेफिकरीने वागून चालणार नाही. कारण रुग्णांचे प्रमाण कमी झाले की आपण लगेच नियमांची पायमल्ली करून वावरत असतो. असेच काहीसे आपण फेब्रुवारी मार्च मध्ये वागलो, कोरोंना गेल्याच्या आविर्भावात राहिलो आणि त्याने परत आपले रूप दाखवले. मग काय पुनः ताळेबंदी करावी लागली, असे आता होऊ नये असे वाटत असेल तर वेळीच सावध व्हा आणि सरकारने लागू केलेय नियमांचे काटेकोर पालन करा.
एक्स्पर्ट च्या मतानुसार, ऑक्टोमबर, नोव्हेंबेर दरम्यान तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. सध्या तरी केरळ आणि महाराष्ट्रा मध्ये संख्या जास्त आहे. काही दिवापासून केरळ ची बाधितांची संख्या लक्षणीय होती . परंतु ती संख्या आता कमी होताना दिसते याचा अर्थ केरळ मधील पीक आता कमी होत आहे. महाराष्ट्रात काही जिल्हे वगळता परिस्थिति नियंत्रणात असल्याचे चित्र दिसते. तरीही पण सर्वांनी खबरदारी घेणे आहे. म्हणजे बाहेर वावरताना मास्क वापरला पाहिजे, एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवले पाहिजे. तिसऱ्या लाटेला येण्यापासून रोखण्यासाठी ही आपल्याला करणे गरचे आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सर्वानी लस घेतली पाहिजे . जेणे करून तुम्ही बाधित झाले तरी गंभीर आजारी पडणार नाहीत.



0 Comments