वाढत्या रुग्ण संख्या बघता कोरोंना चाचण्या वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला
सध्या गणेश उत्सवाच्या काळात गणेश भक्तांचा वावर वाढला आहे. यामुळे उत्सवाच्या भरात कोरोंना च्या नियमांच्या पालना कडे काना डोळा करताना दिसतात. या गोष्टीचा पुढे चालून भयंकर परिणाम होऊ नये यासाठी राज्य सरकारने कोरोंना चाचण्याचा वेग वाढविण्याचा निर्णय घेतला आहे, शिवाय येणाऱ्या तिसऱ्या लाटेची दाहकता जास्त वाढू नये या उद्देशाने राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.
![]() |
| RTPCR चाचणी |
राज्यातील काही जिल्हा मध्ये कोरोंनाचा प्रदुर्भाव वाढताना दिसत आहे. विशेस करून ज्या जिल्ह्यात चाचण्या धीम्या गतीने चालू आहे अश्या जिल्ह्यात जास्तीत जास्त चाचण्या केल्या जात आहेत. जेणे करून त्याच्यावर त्वरित उपचार करून, त्यांच्या पासून होणारा प्रसार नियंत्रणात आणला जाऊ शकेल.
बुलढाणा, अकोला, नंदुरबार, धुळे, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, पालघरआणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये कोरोंना चाचण्या वाढवण्या वर भर दिला जात आहे. या सर्व जिल्ह्यात धीम्या गतीने चाचण्या झाल्या आहेत. या जिल्ह्यांमध्ये सरासरी चांचण्याचे प्रमाण खूप कमी आहे.



0 Comments