११ ऑक्टोबर सोमवार, महाविकास आघाडी तर्फे लखीमपूर खिरी घटनेच्या निषेधार्थ बंद
सोमवारी ११ ऑक्टोबरला सम्पूर्ण महाराष्ट्र बंद ची हाक महाविकास आघाडी कडून देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी या ठिकाणी शेतकरी आंदोलन करत असताना भरधांव वेगाने गाडी आंदोलकानवर चालून त्यांना गाडी खाली चिरडले आहे या घटनेचा निषेध तसेच ज्यांनी हा घृणास्पद प्रकार केला, त्यावर कडक कारवाई व्हावी म्हणून महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाच्या सहमतीने सोमवारी सम्पूर्ण महाराष्ट्र बंद असेल असे जाहीर केले. .या बंद ला संभाजी ब्रिगेड ने आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले.
लखीमपूर खिरीच्या घटने मध्ये ८ आंदोलकांना आपला जीव गमवावा लागला. शेतकरी शांत पणे आंदोलन करत असताना त्यांच्या वर जाणून बुजून चर चाकी गाडी (Fortune ) भरधाव वेगाने चालवुन त्यांचा शेतकरी आंदोलनाचा जीव घेण्यात आला. या गाडीमध्ये स्थानिक मंत्र्यांचा मुलगा होता आणि त्याच्या द्वारेच हि घटना मुद्दाम घडवून आणली गेली. .मंत्राच्या मुलगा असल्याने त्याला अटक केली जात नाही, तेथील सरकारवर विरोधी पक्ष आरोप करत आहे. या घटनेने सर्व देशाला हादरवून टाकले आहे. उत्तर प्रदेशचे मुखमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर विरोधी पक्षांचा प्रचंड दबाव वाढत असून, या घातपाताचा जो जबाबदार आहे त्याला तात्काळ अटक करून त्याच्यावर कडक कारवाही व्हावे असा सम्पूर्ण देशात जण आक्रोश पेटला आहे.
या घटनेचा महाराष्ट्र सरकारने तीव्र शब्दात निषेद केला इतकेच नाही तर सोमवारी या घटनेचा निषेध आणि शेतकरी आंदोलनाला पाठिम्बा म्हणून अगदी कडकडीत बंद पाळण्याचे आवाहन राज्यातील जनतेला करण्यात आले आहे. या निमित्त सर्व शाळा, कॉलेज, तसेच सरकारी आणि खाजगी कार्यालये बंद असतील असे सांगण्यात आले आहे.
0 Comments