Header Ads Widget

Responsive Advertisement

भाज्यांचे भाव भिडले गगनाला


भाज्यांचे भाव भिडले गगनाला 

या वर्षी राज्यात भरपूर प्रमाणात पाऊस झाला, काही भागात तर तो  अत्यधिक प्रमाणात बरसला. त्यामुळे वाहतुकी वर याचा विपरीत परिणाम झाला. अति पावसामुळे भाजी पल खराब झाला. वाहतूक खर्च, पेट्रोल, डिझेल च्या वाढत्या किमती तीमुळे भाजी पाल्याच्या वाहतुकीवर होणारा खर्च, याचा एकंदरीत परिणाम भाजीपलयांच्या किमतीवर झाला आहे.  वाढत्या महागाई मुळे पुरते सर्वच हैराण झाले आहेत. यामुळे सर्व सामान्य  लोकांचे कंबरडे मोडले आहे. आर्थिक ताळमेळ बसवता बसवता लोक परेशान झाले आहेत.

पेट्रोल डिझेल पाठोपाठ आता भाजीपाळ्यांच्या भावाने पण १०० पार केली आहे. सध्या कोथिंबीरीची जुडी ८० ते १०० रुपयांवर गेली आहे. हिरवी मिरची २०० रुपये 

प्रति  किलो झाली आहे.  काही दिवसपूर्वी ५ किंवा १० रुपयन पर्यन्त मिळणारी कोथिंबीरी आणि मिरची चे दर आता गगनाला भिडले आहेत. टोमॅटो, कांदे  असो किंवा इतर पाले भाज्या यांचे दर कित्येक पटीने वाढले आहेत.  त्यामुळे किलो,२ किलो खरीदी करणारे फक्त पांव किलो अर्ध किलो वर समाधान मानत आहेत, कारण भाज्यांचे  भाव इतके वाढले आहेत की सर्व सामान्य लोक खरीदी करताना विचार करत आहेत. 

Post a Comment

1 Comments

  1. Samany manaane kase jagave hech kalat nahi sarvanche bhav vadat ahe pan pagar kahi vadhat nahi

    ReplyDelete