Header Ads Widget

Responsive Advertisement

बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान चा मुलगा ड्रग्स प्रकरणात अटक

 मुंबई च्या समुद्रात हाय प्रोफाइल ड्रग्स पार्टी NCB(Narcotics Control Bureau) ने उधळून लावली. मुंबईतिल समुद्रात Cordelia या क्रुज वर हाय प्रोफाइल लोकांच्या मुलांची आणि मुलींची ड्रग्स पार्टी होणार असि गुप्त सूचना NCB ला मिळाली . या गुप्त माहिती वरुण NCB ने सापळा रचून ८ जणांना ताब्यात घेतले. या मध्ये बॉलीवुड सुपरस्टार शाहरुख खान च्या मुलांचा समावेश आहे.

ही  क्रूझ (जहाज) शनिवार २ ऑक्टोबर च्या रात्री मुंबई वरुण गोव्याला जात होती मध्येच ही जहाज रोखून कसून तपासणी केली गेली. यामध्ये NCB च्या अधिकाऱ्याना चरस, कोकेन, एमडी ड्रग्स टॅब्लेट मिळाल्याची माहिती NCB चे महासंचालक एस. एन. प्रधान  यांनी वृत माध्यमांना दिली. ही पार्टी फॅशन इंडिया आणि दिल्लीतील एका कंपनीने आयोजित केली होती. या बद्दल संबधित पोलिस अधिकारी कसून चौकशी करत आहे. या चौकशी तून मोठ्या ड्रग्स राकेट चा  उलगडा होन्याची शक्यता असून. ही ड्रग्स कुठून मिळते, याचा छडा ही लावण्यात येत आहे. या प्रकरणात मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. 

या पार्टीमध्ये एंट्री फिस ही तब्बल ६० हजारांपासून ते ५ लाखा  पर्यन्त होती. पकडलेल्यांच्या यादी मध्ये - आर्यन खान,अरबाज मर्चंट, मूनमून धमेचा,नुपर सारिका, विक्रांत छोकर, गोमीत चोपडा, ईसमित सिंह, मोहक  जयसवाल यांचा समावेश आहे. 

या ड्रग्स पार्टी मध्ये  बड्या बिजनेसमन, राजकीय नेते  आणि बॉलीवुड मधील मोठ्या स्टार पुत्रांचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जाते. NCB ला या ड्रग्स पार्टीची गुप्त माहिती १५ दिवसपूर्वीच लागली होती. या जहाजावर NCB च्या  २२ अधिकाऱ्याने बनावट प्रवासी बनून प्रवेश मिळवला आणि परतीचा भंडाफोड करून ८ जणांना ताब्यात घेऊन सलग ८ तास कसून चौकशी केली. 

या चौकशीत शाहरुख खान  चा मुलगा आर्यन खान ने सांगितले की, माझा या ड्रग्स पार्टीची काहीही कल्पना नव्हती, आपल्याला फक्त पाहून म्हणून आमंत्रित करण्यात आले असून. आपल्या नावाने ईतरांना या मध्ये सहभाग करण्यास सांगितले गेले आहे, तसेच आपल्या नावाचा गैर फायदा घेतला गेला, असे चौकसी मध्ये सांगितले आहे. आर्यन चा मोबईल ही पोलिसानी जप्त केला आहे. मोबाईल मधील कॉल्स आणि चॅटस संभाषणाची तपासणी करण्यात येत आहे. या चौकशीतून ड्रग्स डिलर आणि पॅडलर ची माहिती मिळवण्याचा प्रयत्न  चालू आहे, आणि त्यांच्यावर कठोर कारवाई चे संकेत दिले आहेत. अभिनेता शाहरुख खानची अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. 



Post a Comment

1 Comments