कोळसा उत्पादनाच्या अभावी येत्या काही दिवसा मध्ये औष्णिक वीज केंद्र बंद पडून सर्व देश विजे अभावी भयंकर संकट ओढवणार आहे. या वर्षी देशामध्ये भरपूर प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे वीज निर्मिती होणाऱ्या कोळस्याच्या खाणी मध्ये पावसाचे पाणी शिरल्या मुले नवीन कोळस्याचे उत्पादनाचं झाले नाही.
त्यामुळे देशातील औष्णिक वीज केंद्र बंद पडून सम्पूर्ण देश अंधारात बुडणार. देशातील ७०% वीज निर्मिती हि कोळस्या द्वारेच होते . सध्या कोळस्याचे प्रमाण अत्यल्प असून कोळसाचे नवीन उत्पादन झालेच नाही. उलट कोरोना काळात आणि कोरोना नन्तर विजेचा वापर प्रचंड प्रमाणात वाढल्याने . येत्या काळात कोळस्या अभावी वीज केंद्र बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. सध्या दिल्ली मध्ये विजेने उग्र रूप धारण केले असून. तेथील वीज केंद्र बंद पडणार असून या विचारानेच तेथील सरकारच्या चिंतेत भर पडली आहे. दिल्ली चे मुखमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधानाला पत्र लिहून, या समस्येचे निराकरण करण्याची विनंती केली आहे. वेळीच उपाय योजना नाही केली. विजे अभावी प्रचंड नुकसान सहन करावे लागेल. दिल्ली प्रमाणेच राजस्थान, उत्तर प्रदेश, झारखंड, महाराष्ट्रा सह हळू हळू सर्व देशात हे संकट पसरणार आहे. ही समस्या इतकी भयंकर आहे की ६ महीने संपूर्ण देशात अंधकार असणार आहे. पररिस्थिती पूर्ववत होण्या साठी मार्च २०२२ पर्यन्त वाढ पहावी लागणार असल्याचे जाणकारांकडून संगीते जात आहे.
महाराष्ट्रात देखील विजेचे संकट भयंकर रूप धारण करणारे आहे. सध्या महाराष्ट्रातील १३ वीज निर्मिती संच बंद पडले आहेत. त्यामुळे ३३३० मेगावॅट वीज पूरवठा झाला ठप्प. सना सुदिच्या काळात वीज भारनियमन(लोडशेडिंग) नाईलाजाने करावी लागू शकते. बंद पडलेल्या संचाची तूट भरून काढण्या साठी, वीज खरेदी सह जलविद्युत आणि इतर स्रोतांकडून वीज पुरवठा उपलब्ध करण्याचे प्रयत्न महावितरण कडून केले जात आहेत.
वीज कमतरतेची हि समस्या केवळ भारतातच नाही तर यापूर्वी चीन सारख्या देशाला सध्या याची झळ बसली आहे. त्याच प्रमाणे दक्षिण अमेरिका आणि युरोप मधील देश देखील या समस्येने ग्रसित झाले होते.
जस जसा देशातील कोरोना काळ संपत आहे तस तसे उद्योग धंदे पुन्हा जोमाने चालू झाला आहे. या मुले विजेचा वापर प्रचंड प्रमाणत वाढला आहे. या उलट
ज्या प्रमाणात वीज निर्मिती करण्यासाठी लागणाऱ्या कोळस्याचे उत्पादन पुरस्थ प्रमाणात झालेच नाही. त्यामुळे सर्व देश्या मध्ये विजेचा तुटवडा काही दिवसा वर येऊन ठेपला आहे. हे संकट दूर करण्यासाठी उच्च स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. गेल्या दोन दीड वर्षीय पासून देश आणि जग कोरोंनाच्या समस्येने ग्रासले होते. आत्ता विजेच्या टंचाईने चिंतेत आहेत.
1 Comments
Oh! No
ReplyDelete