ऐन सणासुदीच्या काळात LPG गॅसच्या किमती मध्ये वाढ
कोरोना काळात महागाई दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अगोदर पेट्रोल डिझेल चे भाव गगनाला भिडले आणि आता स्वयंपाकाचा गॅस मध्ये महागाई ची भर पडली आहे. आता घरगुती गॅस सिलेंडर १५ रुपयांनी महागले आहे. म्हणजेच आता गॅस सिलेंडर ८८४. रुपयाला मिळणार. अगोदरच कोरोना महामारी मुळे सर्व सामन्याचे जीवन मेटाकुटीला आले आहे. बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली, लोकांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम झाला. त्यातच गॅस च्या किमती मध्ये वाढ करून, सामान्य माणसाच्या खिशाला कात्री लावण्याचा प्रकार चालू केला आहे.
जानेवारी पासून गॅस सिलेंडरची किमती आता पर्यंत म्हणजे जवळपास १० महिन्या मध्ये २०५ रुपया पर्यंत वाढली आहे. भारतात LPG गॅस ची आयात सौदी अरब या देशातून होते. जो ४८. १० प्रति मेट्रिक टन, ४८.८१ प्रति किलो आहे . या दरा नुसार १४.२०० ग्राम ची किंमत होते ६९३. १० रुपये, यामध्ये डिस्ट्रिब्युटर चे ६१ रुपये ८४ पैसे, GST ५% आणि इतर खर्च जोडून १४४.५६ हे सर्व मिळून ग्राहकां पर्यंत ८९९. ५० रुपये इतके होते. तेल कम्पन्यानी विना सबसिडी गॅस सिलेंडर च्या किमतीमध्ये वाढ केल्याने गॅस च्या किमती मध्ये वाढ झाल्याचे सांगितले जाते. १५ रुपयांची वाढ काही लोकांना फारसा फरक पडणार नाही, परंतु सामान्य लोकांचे हाल होतील त्याचे काय ? दसरा, दिवाळी चा सण जवळ येऊन ठेपला आहे. आणि LPG गॅस सिलेंडरच्या किमती वाढून सामान्य लोकांचे आर्थिक गणित बिघडविण्याचे काम केले आहे.
3 Comments
Oh! No
ReplyDeleteHi tr jante chi lut ahe kay he yan divali madhe he gas vad zali ahe
ReplyDeleteHi sarkar nako amhala
ReplyDelete